पोषण महिन्यानिमित्त सवड येथे किशोवयीन मुलींना मार्गदर्शन
- Get link
- X
- Other Apps
पोषण महिन्यानिमित्त सवड येथे
किशोवयीन मुलींना मार्गदर्शन
वाशिम, दि. 16 (जिमाका) : पोषण महिना हे अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांमधील ठेंगणेपणा कमी करणे, या बालकांमध्ये अल्प पोषणाचे प्रमाण कमी करणे, 6 महिने ते 59 महिन्यातील बालकांचे ॲनिमिया प्रमाण कमी करणे, किशोरवयीन मुली, गरोदर स्त्रीया, स्तनदा माता यांच्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे हा आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत व महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांच्या मार्गदर्शनात रिसोड एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत नुकतेच सवड येथे किशोरवयीन मुलींची ॲनिमिया तपासणी व बीएमआय काढण्यात आले. तसेच या मुलींना आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जेणेकरुन त्यांच्यातील ॲनिमियाचे प्रमाण कमी होऊन त्या सुदृढ व निरोगी बनतील. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाला बाल विकास प्रकल्प अधिकारी विधाता कवटकर, पर्यवेक्षिका अनिता गिरे, निती आयोगाचे विकासात्मक भागिदार पिरॅमल फाऊंडेशनचे दिगांबर घोडके, आशा गुप्ता, कौशल्या विश्वकर्मा, सीएचओ इंगोले, एएनएम नागोशे, एमपीडब्लू डाहिरे, अंगणवाडी सेविका आशा चव्हाण, श्रीमती राऊत, श्रीमती मसारे, बचतगट संघटिका बालाबाई सोनुने, मदतनीस श्रीमती मोरे, श्रीमती खांदळे व श्रीमती गव्हाणे उपस्थित होत्या.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment