प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी मदत करा निक्षय पोर्टलवर निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन



प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान

क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी मदत करा

निक्षय पोर्टलवर निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

      वाशिम, दि. 28 (जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पूर्वी देशातून क्षयरोगाचे निमुर्लन करण्यासाठी नवीन क्षयरुग्णांची सद्यस्थितीत १८८ रुग्ण प्रति १ लक्ष लोकसंख्येपासून हे प्रमाण ४४ रुग्ण प्रति लक्ष लोकसंख्यापर्यंत व क्षयरोगामुळे होणारे मृत्युचे प्रमाण सद्यस्थितीतील ३६ रुग्ण प्रति १ लक्ष लोकसंख्येपासून ते प्रमाण ३ रुग्ण प्रति १ लक्ष लोकसंख्येपर्यंत कमी करायचे आहे. त्या अनुषंगाने समाजातील विविध घटकांचा सक्रीय सहभाग वाढवून क्षयरुगांना पोषण आहार, निदान सुविधा व व्यावसायीक पुनर्वसन या बाबीकरिता अतिरिक्त मदत मिळवून देणे व त्यासाठी सीएसआर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे हा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा महत्वाकांक्षी उद्देश आहे.

         क्षयरोग विरोधात लढा उभा करण्यासाठी सामाजिक सहभाग वाढविणे, लोकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, क्षयरोगाविषयी स्टिगमा दूर करणे, क्षयरोगग्रस्त व त्यांच्या कुटुंबीयांचा होणारा खर्च कमी करणे. क्षयरुग्णांचा पोषणस्तर वाढवून क्षय बरा होण्याच्या प्रमाणात वाढ करणे या बाबी साध्य करणे अपेक्षीत आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरीता जिल्हयातील लोकप्रतिनिधी, औद्योगिक संस्था, विविध सामाजिक संस्था, व्यक्ती, व्यापारी संघटना आणि व्यावसायीक गट व उद्योग संघटना यांच्या मार्फत क्षयरुग्णांना अतिरिक्त मदत उपलब्ध करुन दयायची आहे.

         तरी निक्षय पोर्टलवर आपली निक्षय मित्र म्हणून नोंदणी करून आपणांमार्फत क्षयरुग्णांना पोषण आहार, निदान

सुविधा व व्यावसायीक पुनर्वसन करण्याकरीता सढळ हाताने मदत करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे