प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना मत्स्य विक्रीकरीता ई-रिक्षा शितपेटीचे लाभार्थ्यांना वाटप
- Get link
- X
- Other Apps
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना
मत्स्य विक्रीकरीता ई-रिक्षा शितपेटीचे लाभार्थ्यांना वाटप
वाशिम, दि. 15 (जिमाका) : ज्यांचे मासेमारी हे उपजिविकेचे साधन आहे. अशा मासेमारी व्यवसाय करणाऱ्या दोन लाभार्थ्यांना आज 15 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते ई-रिक्षा शितपेटीचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सन 2021-22 मधून वारा (जहाँगीर) येथील अनुसूचित जातीच्या गणपत हिवराळे व अनुसूचित जमातीच्या हेमंत चव्हाण यांना ई-रिक्षा शितपेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त एम.व्ही. जयस्वाल, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ए.व्ही. जाधव व अनिता जैन तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment