रुई येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम शेतकऱ्यांची उपस्थिती
रुई येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत उपक्रम
शेतकऱ्यांची उपस्थिती
वाशिम दि.०१(जिमाका) मानोरा तालुक्यातील दुर्गम-डोंगराळ भागातील आदिवासी बहुल मौजे रुई येथे " माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी " उपक्रमाअंतर्गत आज १ सप्टेंबर रोजी उपस्थित शेतकरी व महिला शेतकरी यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान व विविध यंत्रणानिहाय कार्यरत योजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच गावाचे कृषिपुरक उद्योग,सहकारी संस्था यांचे विषयी माहिती देऊन उपस्थित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच सुधारीत तंत्रज्ञान आधारीत सोयाबीन, तूर,संत्रा,फळबाग,शेत शिवारफेरी याविषयी देखील शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रभारी तहसिलदार श्री. राठोड साहेब, तालुका कृषि अधिकारी,श्री.व्ही.के. घोडेकर,पंचायत समितीचे कृषि अधिकारी श्री.डी.एस.मकासरे,सरपंच गजानन चक्रवार,कृषि पर्यवेक्षक श्री.आर.व्ही.सवने,कृषि सहाय्यक श्री.एस.जी.शिंदे,ग्रामसेवक गजानन ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Comments
Post a Comment