4 लक्ष 65 हजार मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडले



4 लक्ष 65 हजार मतदार ओळखपत्र

आधार क्रमांकाशी जोडले

            वाशिम, दि. 16 (जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने मतदार यादयांच्या प्रमाणिकरणासाठी आणि मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून सुरु केला आहे. 16 सप्टेंबरपर्यंत जिल्हयातील 9 लक्ष 52 हजार 545 मतदारांपैकी 4 लक्ष 65 हजार 781 मतदारांच्या मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्यात आले आहे. या कार्यक्रमाविषयी मतदारांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. 11 सप्टेंबर रोजी जिल्हयातील 1 हजार 51 मतदान केंद्र व मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय येथे मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

          मानोरा तालुक्यातील 1 लक्ष 23 हजार 290 मतदारांपैकी 71 हजार 375, रिसोड तालुक्यातील 1 लक्ष 60 हजार 87 मतदारांपैकी 86 हजार 894, मंगरुळपीर तालुक्यातील 1 लक्ष 38 हजार 738 मतदारांपैकी 71 हजार 875, कारंता तालुक्यातील 1 लक्ष 78 हजार 169 मतदारांपैकी 88 हजार 20, मालेगांव तालुक्यातील 1 लक्ष 45 हजार 768 मतदारांपैकी 71 हजार 225 आणि वाशिम तालुक्यातील 2 लक्ष 6 हजार 493 मतदारांपैकी 76 हजार 392 मतदारांचे मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यात आला आहे. जिल्हयाची ही टक्केवारी 48.90 इतकी आहे.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे