साखरा येथील शाळेत विद्यार्थ्यांना दिली तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती
साखरा येथील शाळेत विद्यार्थ्यांना दिली तंबाखूच्या दुष्परिणामाची माहिती
वाशिम,दि.१४ (जिमाका) जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिमच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत १३ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परीणामाची,तंबाखूजन्य
पदार्थामुळे होणारे विविध आजार, तंबाखू नियंत्रण कायदा (कोटपा- २००३) आणि तंबाखूमुक्त शाळा याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्ष म्हणून पी.टी.महाले,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विजय काळबांडे यांची उपस्थिती होती.यावेळी श्री.महाले यांनी विद्यार्थाना मोलाचे मार्गदर्शन करून संपूर्ण शाळा ही तंबाखूमुक्त करण्याकरीता शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी कटिबध्द असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन केले.मानसशास्त्रज्ञ
राम सरसकटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मुख कर्करोग,मुख कर्करोगाची लक्षणे तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन कसे सोडवावे, तंबाखूमुक्ती करीता टोल फ्रि कं. १८००११२३५६ या बाबतची माहिती दिली.यावेळी तंबाखू मुक्तीची सामुहिक शपथ घेवुन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शाळेचे शिक्षकवृंद संतोष आमले, के. एस. व्यास,डि.बि.घोडके,व्हि.जी.महाले. डि.डि.महाले,विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment