श्री. बालाजी संस्थान येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
श्री. बालाजी संस्थान येथे
कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
वाशिम,दि.१२ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त वतीने ८ सप्टेंबर रोजी श्री.बालाजी संस्थान,वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी होते.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.डी.आर.कलवार, बालाजी संस्थानचे विश्वस्थ ॲड.बी.डी.काळू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. टेकवाणी यांनी सर्वानी जागरुक राहून विविध कायदे विषयक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
ॲड. ए. पी. वानरे, यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.ॲड.जी. व्ही. मोरे यांनी सार्वजनिक सेवा, राज्य व केंद्र शासनाच्या योजनेंबाबत मार्गदर्शन केले.ॲड.पी.एन.भंसाळी यांनी नैसगिक आपत्तीमध्ये बळी पडलेल्यांकरिता अस्तीत्वात असलेल्या योजनांबाबतची माहिती दिली.ॲड. पी.के सावरकर यांनी मानसिक रुग्णांकरीता घ्यावयाची काळजी व मानसिक रुग्ण होवू न देणे बाबत मार्गदर्शन केले.ॲड. एन.टी जुमडे यांनी जेष्ठ नागरीक, लहान मुले-मुली यांच्या अधिकारांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी,बालाजी संस्थांनचे विश्वस्त आणि नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
******
Comments
Post a Comment