मानसी परिचारीका विद्यालयात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी



मानसी परिचारीका विद्यालयात

ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

        वाशिम, दि.२३ (जिमाका) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आज २३ सप्टेंबर रोजी वाशिम येथील मानसी परिचारीका विद्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक श्रीमती गिताबाई धोंगडे होत्या. यावेळी डॉ. अरुण बिबेकर, डॉ. गौरव भागडिया, डॉ.पंकज गोटे, डॉ.सचिन इंगोले, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

       कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नागरीक श्रीमती गिताबाई धोंगडे यांची प्रथम आरोग्य तपासणी करुन करण्यात आली. त्यानंतर २७ जेष्ठ नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडातील कॅल्शीयम तसेच इतर आरोग्य तपासणी करुन डॉक्टरांनी त्यांना आवश्यक तो आरोग्यविषयक सल्ला दिला. डॉ.अरुण बिबेकर, डॉ. गौरव भागडिया, डॉ. पंकज गोटे, डॉ. सचिन इंगोले यांनी ज्येष्ठ नागरिकांना उदभवणाऱ्या विविध आजारांबाबत तसेच त्यावरील उपचाराबाबत मार्गदर्शन करुन आरोग्य शिबीरामध्ये तपासणी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते, संध्या देखणे, आर. टी.चव्हाण, मानसी परिचारीका विद्यालयातील प्रशिक्षक, कर्मचारी व ज्येष्ठ नागरीकांची उपस्थिती होती.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे