राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा नागरीकांचे प्रलंबित अर्ज व तक्रारी निकाली काढण्याबाबतजिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा
नागरीकांचे प्रलंबित अर्ज व तक्रारी निकाली काढण्याबाबत
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
वाशिम, दि. 22 (जिमाका) 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. 10 सप्टेंबरपर्यंत विविध विभागांकडे नागरीकांचे प्रलंबित असलेले पोर्टलवरील तसेच प्रत्यक्ष आलेले अर्ज व तक्रारी निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.यांनी दिले.
आज 22 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवडयाच्या निमित्ताने विविध विभागांकडे प्रलंबित अर्जाचा आढावा आयोजित सभेत श्री. षन्मुगराजन यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, कौशल्य व रोजगार विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती कोरे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. खंबायत, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सैय्यद, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. वानखेडे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयस्वाल, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष आकोसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षन्मुगराजन म्हणाले, यंत्रणांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या अर्जाचा व तक्रारींचा 2 ऑक्टोंबरपर्यंत निपटारा करावा. दररोज निकाली काढण्यात येणाऱ्या तक्रारी व अर्जाची माहिती उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. पोर्टलवर प्रलंबित असलेले अर्ज 25 सप्टेंबरपर्यंत निकाली काढावेत. 2 ऑक्टोंबरपर्यत जे अर्ज व तक्रारी निकाली निघणार नाही, त्याची माहिती लेखी स्वरुपात सादर करावी. असे ते म्हणाले.
श्री. हिंगे यांनी विविध विभागाकडे प्रलंबित अर्जाची व तक्रारींची माहिती यावेळी दिली. कृषी विभागाकडे 214, सहकार विभागाकडे 10, महावितरणकडे 94, गृह विभागाकडे 1661, उद्योग विभागाकडे 3, कामगार विभागाकडे 17, महसूल विभागाकडे 31,558, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे 2306, लाभार्थ्यांचे अर्ज प्रलबित असून यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्द पेंशनचे 197, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेचा एक अर्ज, एक दिव्यांग ओळखपत्र, एक वसतीगृह प्रवेश, विशेष शाळेच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरणाचा एक अर्ज, संजय गांधी निराधार निधी योजनेचे 1023 अर्ज, श्रावण बाळ योजनेचे 1082 अर्ज, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 12, नगरप्रशासनचे 106 नवीन नळजोडणीचे अर्ज व इतर विभागासह एकुण 21 विभागाचे 35 हजार 997 अर्ज प्रलंबित आहे. तर विविध पोर्टलवर 106 तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती श्री. हिंगे यांनी दिली.
सन 2022-23 या वर्षात विविध 21 विभागांकडे नागरीकांचे 2 लाख 1 हजार 572 अर्ज व तक्रारी प्राप्त झाल्या. आतापर्यत 1 लक्ष 65 हजार 575 अर्ज निकाली काढण्यात आले. 5416 अर्ज हे अर्जदाराच्या अर्जातील त्रृटीमुळे प्रलंबित आहे. एकूण 35 हजार 997 अर्ज प्रलंबित आहे. येत्या 2 ऑक्टोंबरपर्यंत हे अर्ज संबंधित विभागाला निकाली काढावयाचे आहे.
या सभेला वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. पी. राऊत, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता आनंद राजूरकर, जिल्हा कारागृह अधिक्षक पी. ओ. इंगळे, जिल्हा रेशीम अधिकारी एस. पी. फडके, सर्व नगरपलिका व नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. तर सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी आणि सर्व तालुका कृषी अधिकारी हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सभेला सहभागी होते.
*******
Comments
Post a Comment