श्रीमती वसुमना पंत यांची शिवनी अंगणवाडीला भेट
श्रीमती वसुमना पंत यांची शिवनी अंगणवाडीला भेट
वाशिम दि.28 (जिमाका) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आज २८ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यातील शिवनी रोड येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांनी दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या शारदा वडसे यांचे अभिनंदन केले. अंगणवाडी केंद्राची पाहणी करून त्यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला.पोषण आहाराबाबत देखील चर्चा केली.गावात बेटी बचाव बेटी पढाओ आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी प्रचार - प्रसिद्धी करण्याच्या तसेच पात्र मातांना योजनांचा लाभ देण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, गटविकास अधिकारी श्री.अवगण, बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन लुंगे, सरपंच श्री.गारावे,अंगणवाडी सेविका व मदतनीस यावेळी उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment