समाज कल्याण कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा



समाज कल्याण कार्यालयात

माहिती अधिकार दिन साजरा

      वाशिम, दि. 28 (जिमाका) : सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम येथे माहिती अधिकार दिन आज 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ होते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे अंतर्गत कलम 26 (1) (क) व (ख) अन्वये या अधिकाराबाबत सर्व सामान्य नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.

           यावेळी श्री. वाठ यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती अधिकाराची प्रक्रीया तातडीची व सुटसुटीत असावी. अपीलार्थीसुध्दा जागरुक असणे गरजेचे आहे. कार्यालयाकडून सामान्य नागरीकास माहिती मागविण्याची पध्दती आणि शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना माहिती देण्याची पध्दती याविषयी जागरुक करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे