राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमीत्त ज्येष्ठ नागरिकांकरिता 'जागतिक स्मृतीभ्रंश दिन कार्यशाळा व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमीत्त
ज्येष्ठ नागरिकांकरिता 'जागतिक स्मृतीभ्रंश दिन कार्यशाळा व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
वाशिम,दि.२१ (जिमाका) लक्ष्मीबाई गोरुले फिजीओथेरेपी महाविद्यालय व राजर्षी शाहू परिचारीका विद्यालय वाशिम येथे जागतिक स्मृतीभ्रंश दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांकरीता कार्यशाळा व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज २१ सप्टेंबर रोजी आयोजित आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय प्रा.संजय साळीवकर, लक्ष्मीबाई गोरुले फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे संस्थाचालक राजेश गोरुले,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ,राजर्षी शाहू परिचारीका विद्यालयाचे प्राचार्य श्री.टोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा.साळीवकर यांनी जागतिक स्मृतिभ्रंश दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले व भावी निरोगी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
आरोग्य शिबीरादरम्यान जेष्ठ नागरिक श्रीमती यशोदाबाई वाघमारे यांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली.त्यानंतर उपस्थित ४० जेष्ठ नागरिकांची मधुमेह,उच्च रक्तदाब,हाडातील कॅल्शीयम तसेच इतर आरोग्य तपासणी करुन डॉक्टरांनी आरोग्यविषयक सल्ला दिला.
कार्यक्रमाला समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते,कनिष्ठ लिपीक संध्या देखणे,लक्ष्मीबाई गोरुले फिजीओथेरेपी महाविद्यालयाच्या डॉ.तेजस्वीनी फटींग, श्रीमती गायकवाड, ज्येष्ठ नागरिक बबन सारसकर, शाहु परिचारीका विद्यालय येथील प्रशिक्षक,कर्मचारी वृंद व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment