सेवा पंधरवडानिमित्त पडताळणी समितीने जाणून घेतल्या अभ्यागतांच्या अडचणी व जात प्रमाणपत्रांचे वितरण
- Get link
- X
- Other Apps
सेवा पंधरवडानिमित्त
पडताळणी समितीने जाणून घेतल्या
अभ्यागतांच्या अडचणी व जात प्रमाणपत्रांचे वितरण
वाशिम, दि. 19 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवडयाच्या निमित्ताने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय वाशिमच्या वतीने विविध कार्यक्रम, कार्यशाळा, मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे.
सेवा पंधरवडयानिमित्त आज 19 सप्टेंबर रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय वाशिम येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व नागरीकांच्या अडीअडचणी समितीने जाणून घेतल्या. त्यांच्या त्रृटींची पुर्तता करण्यात येऊन जात वैधता प्रमाणपत्र आयोजित कार्यक्रमात वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांना व नागरीकांना या कार्यक्रमातून जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे पोलीस उपअधिक्षक सुहास सातार्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ॲड. किरण राऊत यांनी केले. आभार गोपाल गणोदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती पवार, सुमित खंडारे, मोहन तिडके, वैभव घुगे, पंकज ठाकूर, कविता पुर्णे, राम कास्टे व संजय ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment