कोटपा कायद्याअंतर्गत मंगरुळपीर येथे20 पान टपऱ्यांवर कारवाई 3900 रुपयांचा दंड वसूल



कोटपा कायद्याअंतर्गत मंगरुळपीर येथे

20 पान टपऱ्यांवर कारवाई

3900 रुपयांचा दंड वसूल

 

           वाशिम, दि. 16 (जिमाका) :   राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम, ग्रामीण रुग्णालय, मंगरुळपीर आणि पोलीस स्टेशन, मंगरुळपीर यांच्या संयुक्त वतीने आज 16 सप्टेंबर रोजी मंगरुळपीर शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा अर्थात कोटपा कायदा 2003 अंतर्गत उल्लंघन करणाऱ्या 20 पान टपरी धारकांवर दंडात्मक कारवाई करुन 3900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

           कोटपा कायदा अंमलबजावणी पथकाने मंगरुळपीर शहरातील मानोरा चौक, कारंजा चौक, बसस्थानक, तहसिल कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, श्री छत्रपती शिवाजी चौक येथील पान टपरी धारकांवर धडक कारवाई केली. या पथकाने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीकांत जाधव व पोलीस निरीक्षक श्री. हुड यांच्या मार्गदर्शनाखाली कोटपा कायदयाचे उल्लंघन करणाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली. या कायद्यातील कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे, कलम 6 (अ) नुसार 18 वर्षाखालील व्यक्तीला तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी, कलम 6 (ब) नुसार शैक्षणिक संस्थेच्या 100 मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी या नियमाअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. धुम्रपान निषेध निर्देश फलक व 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे. असे निर्देश फलक पान टपरीवर लावण्याच्या सूचना या पथकाने संबंधित पान टपरी चालकांना दिल्या.

           जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे मानसशास्त्रज्ञ राम सरकटे, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे, ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर येथील एन.सी.डी विभागाचे पुनर्वसन कर्मचारी महेश बारगजे, पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. आघाव, अमोल मुंदे, मोहम्मद परसुवाले, अमोल वारकड, रुपेश नाईक यांचे या कारवाईसाठी सहकार्य लाभले.   

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे