पंधरवडयादरम्यान नागरीकांचे प्रलंबित अर्ज व तक्रारी निकाली काढा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

पंधरवडयादरम्यान नागरीकांचे प्रलंबित अर्ज व तक्रारी निकाली काढा

                                                          - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 

वाशिम, दि. 23 (जिमाका) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. विविध विभागांकडे जिल्हयातील नागरीकांचे प्रलंबित असलेले पोर्टलवरील तसेच प्रत्यक्ष आलेले अर्ज व तक्रारी येत्या 2 ऑक्टोबरपूर्वी यंत्रणांनी निकाली काढाव्यात. असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले.

आज 23 सप्टेंबर रोजी सेवा पंधरवडयाच्या निमित्ताने विविध विभागांकडे प्रलंबित अर्ज व तक्रारीचा आढावा आयोजित सभेत डॉ. पांढरपट्टे यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., अप्पर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, नितीन चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चंद्रकांत यादव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी. राऊत, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधिक्षक श्री. वानखेडे, नगर परिषदेचे अधिक्षक व्ही.एल. पाटील, महावितरणचे प्रतिनिधी श्री. काळे, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी एस.टी. धतुडे व आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. अमोल धंदर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले, विविध विभागाकडे विविध योजनांचे तसेच शासकीय कामानिमित्त लाभार्थ्यांचे व नागरीकांचे अर्ज व तक्रारी येत असतात. या पंधरवडादरम्यान 10 सप्टेंबरपर्यंत यंत्रणांकडे प्राप्त झालेले अर्ज व तक्रारी येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढाव्यात असे उपस्थित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच विविध यंत्रणांकडे प्रलंबित असलेले अर्ज व तक्रारींची माहिती घेतली.

यावेळी डॉ. पांढरपट्टे यांनी जनावरांवरील लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने गुरांच्या लसीकरणाची माहिती, जिल्हयातील शेतकरी आत्महत्या, आगामी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक व मतदार ओळखपत्र आधार लिंकींग बाबतच्या माहितीचा देखील आढावा घेतला.

श्री. हिंगे यांनी विविध विभागाकडे प्रलंबित अर्जाची व तक्रारींची माहिती यावेळी दिली. विविध विभागाकडे 2 लक्ष 6 हजार 318 अर्ज व तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 1 लक्ष 70 हजार 49 अर्ज व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. 36 हजार 269 अर्ज व तक्रारी प्रलंबित आहे. यामध्ये कृषी विभागाकडे 214, सहकार विभागाकडे 10, ऊर्जा विभागाकडे 81, उच्च व तंत्र विभागाकडे 7, गृह विभागाकडे 1942, उद्योग विभागाकडे 5, कामगार विभागाकडे 17, विधी व न्याय विभागाकडे 3, महसूल विभागाकडे 31,559 प्रलंबित असून काल एकाच दिवशी 4 हजार 12 अर्ज व तक्रारींचा निपटारा करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे 2306, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे 13, नगरपालिका विभागाकडे 107 आणि महिला व बाल कल्याण विभागाकडे 5 असे एकूण 36 हजार 269 लाभार्थ्यांचे व नागरीकांचे अर्ज व तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती श्री. हिंगे यांनी दिली.

यावेळी महसूल विभागाअंतर्गत प्रलंबित असलेले प्रकरण सेवा पंधरवडानिमित्त निकाली काढून उत्पन्नाचे प्रमाणपत्र लाभार्थी विश्वनाथ वानखेडे, गजानन इंगळे, पार्वती इंगळे, सलिम शहा अयुब शहा, अनिल शेट्टे, नामदेव कांबळे, अधिवास प्रमाणपत्र कोमल इंगळे, आदित्य शेट्टे, अनिकेत घाटोळ, अक्षय लगड, शेतकरी असल्याचा दाखला ब्रम्हा येथील विनोद ब्रम्हेकर, अल्पभूधारक प्रमाणपत्र रामेश्वर वानखेडे, नॉन क्रिमीलेअर रुषिकेश बोडखे, अरविंद जाधव, उत्तपन्न प्रमाणपत्र संदिप लबडे व जातीचे प्रमाणपत्र पार्वती फुलउंबरकर, शिवांशीस कैथवास व हरिओम भोयर या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 

                                                                                                                                                       *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे