21 सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवन येथे जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार सत्यशोधन दिन कार्यशाळा



21 सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवन येथे

जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार सत्यशोधन दिन कार्यशाळा

 

       वाशिम, दि. 19 (जिमाका) : जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती, वाशिम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, वाशिम आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा शाखा, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 21 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात दुपारी 3 वाजता जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार सत्यशोधन दिन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

         कार्यशाळेचे उदघाटन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तथा जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीचे सदस्य सचिव मारोती वाठ हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिमचे अध्यक्ष एल.बी. राऊत, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, वाशिम उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी, वाशिम तहसीलदार विजय साळवे, वाशिम ठाणेदार शेख रफीक, महिला संरक्षण अधिकारी बी. बी. धनगर, वाशिम नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिपक मोरे, मानसोपचार तज्ञ डॉ. मंगेश राठोड, गोटे महाविद्यालयाचे संस्थापक नारायण गोटे, प्रसंग करिअर अकॅडमीचे संचालक डॉ. गजपाल इंगोले, तर प्रमुख मार्गदर्शक तथा वक्ता म्हणून कृष्णात स्वाती (कोल्हापूर), आरती नाईक (पनवेल), भास्कर सदाकाळे (सांगली) व रूपेश वानखेडे (यवतमाळ) हे मार्गदर्शन करणार आहेत.

         जिल्ह्यातील विविध महाविद्यालयात युवकासांठी जोडीदाराची विवेकी निवड, उज्ज्वल उद्यासाठी वारसा समाज सुधारकांचा, विवेकाचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा व हसत खेळत विज्ञान तथा मनोरंजनातून विज्ञान आणि जादूटोणा विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम, आर. ए. कॉलेज वाशिम, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, शासकीय आदिवासी आश्रमशाळा मुसळवाडी ता. मालेगाव, श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा जऊळका (रेल्वे) ता. मालेगाव, रामराव झनक महाविद्यालय, मालेगाव, रुख्मिणीदेवी जोगदंड महाविद्यालय डव्हा ता. मालेगाव आदी महाविद्यालयात देखील याच दिवशी जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार सत्यशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी, महिला बचतगट, युवा, युवती, शाळा/महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने डॉ. रामकृष्ण कालापाड, डॉ. एम. बी. डाखोरे, दिनकर बोडखे, पी. एस. खंदारे, प्रा. उन्मेश घुगे, बालाजी गंगावणे, कुसुमाताई सोनुने, प्रा. अनिल बळी, प्रा. महेश देवळे, नाजुकराव भोंडणे, सुनील वैद्य, बाबाराव गोदमले, दत्तराव वानखेडे, राजू दारोकार,नीलेश भोजणे, सुखदेव काजळे, रमेश मोरे, ॲड. दिपाली सांबर, जीवन हगवणे, राम शृंगारे, प्रा. अशोक वाघ, आनंदराव खुळे व जिल्हा जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती, वाशिमच्या वतीने करण्यात आले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे