ई- कार्ड तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांची रिठद व आसेगाव येथील सीएससी केंद्राला भेट
- Get link
- X
- Other Apps
ई- कार्ड तयार करण्याची प्रक्रिया
जिल्हाधिकाऱ्यांची रिठद व आसेगाव
येथील सीएससी केंद्राला भेट
वाशिम, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून ई - कार्ड तयार करण्याचे सुरू आहे. ई -कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज २८ सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील रिठद आणि आसेगाव (पेन) येथील सीएससी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, तहसीलदार अजित शेलार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले व आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ रणजीत सरनाईक यांची उपस्थिती होती.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. सर्व लाभार्थ्यांना सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ई- कार्ड मोफत तयार करून देण्याचे काम जिल्ह्यात सध्या सुरू आहे. ई - कार्ड तयार करून देण्याची प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून वेगाने पूर्ण व्हावी यासाठी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन हे लाभार्थी आणि सीएससी/आपले सरकार सेवा केंद्र संचालकांना प्रोत्साहित करीत आहे.
श्री.षण्मुगराजन यांनी आज रिठद व आसेगाव(पेन) येथे भेटीदरम्यान उपस्थित लाभार्थ्यांशी तसेच केंद्र चालकांशी संवाद साधला. केंद्र चालकाशी संवाद साधतांना त्यांनी ई - कार्ड तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेतली. ई- कार्ड कसे तयार करतात त्याचे प्रात्यक्षिक बघितले.लाभार्थ्याची आवश्यक कागदपत्रे कशाप्रकारे अपलोड केली जातात याची माहिती त्यांनी सीएससी केंद्र चालकाकडून घेतली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment