११ सप्टेंबरला मतदार ओळखपत्रला आधार क्रमांक जोडा

११ सप्टेंबरला मतदार ओळखपत्रला आधार क्रमांक जोडा 

तहसीलदार विजय साळवे यांचे आवाहन 

वाशिम दि.९(जिमाका) मतदार यादीतील दुबार नावे वगळून मतदार याद्यांच्या प्रमाणीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ११ सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातील १५० आणि शहरी भागातील ५९ अशा एकूण २०९ मतदान केंद्रावर तसेच तहसील कार्यालय वाशिम येथे निवडणूक शाखेत मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी ११ सप्टेंबर २०२२ रोजी शिबिराचे आयोजन केले आहे. तरी मतदारांनी त्यांच्याशी संबंधित मतदान केंद्राला किंवा तहसील कार्यालय,वाशिम येथील निवडणूक शाखेला भेट देऊन मतदार ओळखपत्राला आधार क्रमांकाशी जोडावे,असे आवाहन वाशीमचे तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे