आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शिबीरांचे आयोजन
- Get link
- X
- Other Apps
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत
शिबीरांचे आयोजन
वाशिम, दि. 21 (जिमाका) : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी प्रमुख असलेल्या आयुष्मान भारत योजनेला 23 सप्टेंबर रोजी चार वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्तान आयुष्मान भारत पंधरवडा मोहिम राबविण्यात येत आहे. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत ग्रामीण भागात मोफत आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयात महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्मान भारत योजनेशी संबंधित सरकारी व खाजगी रुग्णालयाच्या वतीने शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
22 सप्टेंबर रोजी मालेगांव तालुक्यातील कोल्ही येथे. 24 सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील तरोडी येथे. 27 सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील देपूळ येथे. 28 सप्टेंबर रोजी मालेगांव तालुक्यातील आंबापूर येथे. 29 सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील आमगव्हाण व वाशिम तालुक्यातील जांभरुन (जहाँगीर) येथे आणि 30 सप्टेंबर रोजी मालेगांव तालुक्यातील पांगरी (नवघरे) येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबीराच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी, औषधी वाटप व आयुष्मान भारत योजना नोंदणी व कार्ड वाटप आणि आभा कार्ड नोंदणी व कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरीकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment