सेवा पंधरवडानिमीत्त देगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

सेवा पंधरवडानिमीत्त 

देगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी 

वाशिम,दि.२०(जिमाका) 
सेवा पंधरवडानिमीत्त रिसोड तालुक्यातील देगाव येथील आयुर्वेद महाविद्यालय,रुग्णालय व संशोधन केंद्रात ज्येष्ठ नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आज २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले.
       अध्यक्षस्थानी गोवर्धन येथील श्रीमती अंतकला अंभोरे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित ज्येष्ठ नागरिक श्रीमती अंतकला अंभोरे यांची सर्वप्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह,उच्च रक्तदाब,हाडातील कॅल्शीयम तसेच इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये एकुण ३५ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करुन डॉक्टरांनी आरोग्यविषयक योग्य तो सल्ला दिला.
      कार्यक्रमाला  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या कनिष्ठ लिपीक श्रीमती एस.पी.देखणे, आयुर्वेद महाविद्यालय,रुग्णालय व संशोधन केंद्र देगाव येथील डॉ. अमोल नरवाडे,डॉ.अनंत पावडे,डॉ.दिपक पवार,डॉ.आश्विनी पांडे,डॉ.अपुर्वा ढापुलकर,राष्ट्रीय हेल्पलाईनचे ज्ञानेश्वर टेकाळे,आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र देगाव येथील प्रशिक्षक तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे