राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमित्तसमाज कल्याण कार्यालयाच्या वतीने 485 ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमित्त
समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने
485 ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी
वाशिम, दि. 29 (जिमाका) : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, वाशिम, सावित्रीबाई नर्सींग महाविद्यालय व संत गजानन महाराज संस्थान, वाशिम यांच्या संयुक्त वतीने आय.यु.डी.पी. कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदीर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आज 29 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरीक श्रीमती सुशीलाबाई जाधव होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, माजी आमदार अॅड. विजयराव जाधव, गजानन महाराज संस्थानचे संचालक दयाराम राऊत, सावित्रीबाई नर्सींग महाविद्यालयाचे संचालक वसंतराव धाडवे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरीक श्रीमती सुशिलाबाई जाधव यांची आरोग्य तपासणी करून इतर उपस्थित जेष्ठ नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडातील कॅल्शीयम तसेच इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात ४८५ जेष्ठ नागरिकांची तपासणी करुन डॉक्टरांनी त्यांना आरोग्यविषयक सल्ला दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.
समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्या मार्गदर्शनात राहुल शिरभाते, श्रीमती संध्या देखणे, संत गजानन महाराज संस्थानचे सर्व कर्मचारी व सावित्रीबाई नर्सींग महाविद्यालयातील कर्मचारी व प्रशिक्षक यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment