सप्टेंबर महिन्यातील धान्य वितरणाचे परिमाण, दर जाहीर


वाशिम, दि. ०३ (जिमाका) :  जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे.

अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिका १५ किलो गहू व २० किलो तांदुळ वितरीत केली जाणार आहे. याकरिता गहू प्रति किलो २ रुपये व तांदूळ प्रति किलो ३ रुपये दर राहील. प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ परिमाण असेल. तर गहू प्रतिकिलो २ रुपये व तांदुळ ३ रुपये किलो असा दर राहणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात येणार आहे, असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर