ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
वाशिम, दि. २० : मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन
अर्थात ईव्हीएम यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट यंत्राच्या वापराबाबतची माहिती मतदारांना देण्यासाठी
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आजपासून जनजागृती मोहीम
सुरु करण्यात आली आहे. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी
दाखवून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी मोहिमेचा
शुभारंभ केला.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,
वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, निवडणूक विभागातील नायब तहसीलदार श्री. पाटील, माधव
शिंदे आदींची उपस्थिती होती.
आगामी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कार्यप्रणालीची माहिती
प्रत्येक मतदाराला व्हावी, यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने
प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापराची प्रात्यक्षिके मतदारांना
दिली जाणार आहेत. याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर पथके स्थापन करण्यात आली आहेत.
Comments
Post a Comment