हृषीकेश मोडक यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली



वाशिम, दि. ०९ :  वाशिमचे नवनियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी श्री. मीना यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार बळवंत अरखराव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वानखेडे, महसूलच्या तहसीलदार शीतल वाणी, नगरपरिषद मुख्याधिकारी वसंत इंगोले उपस्थित होते.
            श्री. मोडक हे २००८ च्या बॅचचे मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत त्यांनी मणिपूर राज्यात विविध पदांवर काम केले आहे. तसेच एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत मणिपूर राज्यातील उखरूल जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. वाशिम येथे नियुक्ती होण्यापूर्वी ते राज्याच्या आदिवासी विकास विभागात नागपूर येथे अपर आयुक्त म्हणून कार्यरत होते. वाशिम जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडून जिल्ह्यातील महत्वाचे विषय, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माहिती संकलनाची सद्यस्थिती, भारतीय जैन संघटनेमार्फत जिल्ह्यात सुरु असलेली जलसंधारणाची कामे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी आदी विषयांची माहिती जाणून घेतली.

Comments

  1. पंतप्रधान रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर अनुदान मंजूर झाली नाही आतापर्यंत कुपा करावी सामान्य शेतकरी आहे खुप गरीब प्ररिस्थिती आहे विहीर अनुदान मंजूर करून द्यावी

    ReplyDelete
  2. पंतप्रधान रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर अनुदान मंजूर करून द्यावी गरीब असल्यामुळे आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे