निवडणूक विषयक विविध पथकातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण



लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी

वाशिम, दि. १५ : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनामार्फत सुरु आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध पथके स्थापन करण्यात आली असून या पथकांमध्ये समावेश असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात घेण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी खर्च निरीक्षण पथक, लेखा पथक, भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी), व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) यासारख्या विविध पथकांची विधानसभा मतदारसंघनिहाय स्थापना करण्यात आली आहे. तसेच खर्च निरीक्षक, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमधील अधिकाऱ्यांनी निवडणूक पार पाडावयाची जबाबदारी, प्रत्येक स्तरावर करावयाचे कामाचे नियोजन, तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या विहित नमुन्याबाबत व आज्ञावलीबाबत या प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे