जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना कर्ज मंजुरी पत्र सादर करण्यास १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ


वाशिम, दि. ०४ : जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अधिकृत परवाना असलेल्या वित्तीय संस्थेकडून या योजनेच्या शासननिर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीनद्वारे सादर करण्यास दि. १३ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अयोग्य मंजुरी पत्र सादर केलेले अर्जदारही या मुदतीत पुन्हा मंजुरी पत्र सादर करून शकतील, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी कळविले आहे.
जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी http://eme.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा परवाना असलेल्या वित्तीय संस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा परवाना असलेल्या वित्तीय संस्थाकडून या योजनेच्या शासन निर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीन आयडीद्वारे दि. १३ एप्रिल २०१८ पर्यंत सादर करावयाचे आहे. कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दायित्व, अनुज्ञेय असलेल्या व्याजाच्या परताव्याच्या रकमेकरिता कर्जाच्या रकमेची कमाल मर्यादा १७.६० लक्ष रुपये राहील व त्यानुसार ५ वर्षामध्ये शासनामार्फत कमाल व्याज परतावा रक्कम ५.९० लक्ष रुपये पर्यंत राहील, अट वित्तीय संस्थेस मान्य असल्याचे स्पष्ट नमूद असावे. कर्ज मंजुरीबाबतचे संपूर्ण अटी व शर्ती यांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील, असे जिल्हा उपनिबंधक श्री. कटके यांनी कळविले आहे.
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे