समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची चित्ररथाद्वारे जनजागृती
· जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते शुभारंभ
वाशिम, दि. ०५ : राज्य
शासनाने सुरु केलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची तसेच महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत
पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला आज
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उप
अभियंता बी. बी. बलखंडे, नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे, सहाय्यक लेखा अधिकारी सीमा
वानखेडे, कार्यक्रम व्यवस्थापक एस. जी. कदम, सचिन राऊत आदी उपस्थित होते.
समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची तसेच
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोणती कामे करता येतील, तसेच
ही कामे घेण्यासाठी अर्ज कोणाकडे सादर करावा यासह इतर माहिती या चित्ररथाच्या
माध्यमातून दिली जाणार आहे. दि. ५ ते २४ एप्रिल २०१८ या कालावधीत ग्रामीण भागात हा
चित्ररथ फिरणार आहे. राज्य शासनाची वृक्ष लागवड मोहीम व महाराष्ट्र हरित सेना
नोंदणीविषयी सुध्दा चित्ररथाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.
दि. ५ एप्रिल रोजी रिसोड तालुक्यातील रिठद,
आसेगाव पेन, चिखली, वनोजा, रिसोड, दि. ६ एप्रिल रोजी वाकद, मोप, लोणी बु., भर
जहांगीर, दि. ७ एप्रिल रोजी केनवड, मांगुळ झनक, केशवनगर, गोवर्धन, दि. ८ एप्रिल
रोजी वाशिम तालुक्यातील उकळी पेन, वाशिम, देवठाणा, सुकळी, सायखेडा, दि. ९ एप्रिल
रोजी अडोळी, खंडाळा, जुमडा, नागठाणा, दि. १० एप्रिल रोजी केकतउमरा, विळेगाव,
कोकलगाव, तोंडगाव, दि. ११ एप्रिल रोजी अनसिंग, शिरपुटी, कृष्णा, वारला, दि. १२
एप्रिल रोजी मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार, तऱ्हाळा, हिरंगी, शेंदूरजना मोरे,
दि. १३ एप्रिल रोजी आसेगाव, पिंपळगाव, कुंभी, शिवनी, दि. २५ एप्रिल रोजी बिटोडा
भोयर, कासोळा, दस्तापूर, धानोरा खुर्द, दि. १५ एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील कोलार,
गिरोली, शेंदूरजना बाजार, दि. १६ एप्रिल रोजी उमरी बाजार, फुलउमरी, गव्हा, दि. १७
एप्रिल रोजी माहुली, वाईगौळ, पोहरादेवी (बाजार), दि. १८ एप्रिल रोजी कारंजा
तालुक्यातील खेर्डा बु., कामरगाव, धनज बु., ढंगारखेडा, दि. १९ एप्रिल रोजी कामठवाडा,
सोमठाणा, उंबर्डाबाजार, मनभा, धनज फु., दि. २० एप्रिल रोजी पसरणी, वडगाव इझारा, धामणी,
वाघोळा, दि. २१ एप्रिल रोजी काजळेश्वर, महागाव, लोहगाव, पोहा, शिवनगर, तुळजापूर, दि.
२२ एप्रिल रोजी मालेगाव तालुक्यातील अमानी, वसारी, शिरपूर, करंजी, दि. २३ एप्रिल
रोजी मेडशी, सुकांडा, जऊळका, किन्हीराजा, दि. २४ एप्रिल रोजी मालेगाव, पांगरीकुटे,
डोंगरकिन्ही, चांडस या गावांमध्ये चित्ररथ जाणार आहे.
*****
Comments
Post a Comment