स्काऊट गाईड नोंदणीमध्ये वाशिम जिल्हा अमरावती विभागात प्रथम



वाशिम, दि. १६ :  महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस राज्य कार्यालयाच्या निकषानुसार सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सर्वात जास्त युनिट नोंदणी सदस्य संख्येसाठी वाशिम भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालयाला अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळाला. नुकतेच मुंबई येथे झालेल्या पारीतोषिक वितरण सोहळ्यात राज्य अध्यक्ष ज्ञानबा मुंडे व राज्य माजी मुख्य आयुक्त भा. ई. नगराळे यांच्या हस्ते अमरावती विभागाचे सहाय्यक राज्य आयुक्त गाईड रजनीताई धानोरकर, सहाय्यक राज्य आयुक्त स्काऊट रमेश चांदुरकर, जिल्हा आयुक्त स्काऊट एस. आर. पुंड व राज्य मंडळ सदस्य बबन आघाव यांनी प्रातिनिधिक स्वरुपात हा बहुमान स्वीकारला.
वाशिम भारत स्काऊटस आणि गाईडसच्या या यशाबद्दल जिल्हा कार्यालयाचे अध्यक्ष आमदार अमित झनक, उपाध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक, गणेश काळे, विठ्ठलराव पाटील, जुगलकिशोर कोठारी, वेणूताई गोटे, जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी तानाजी नरळे, अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी ए. एस. आहाळे, जिल्हा आयुक्त गाईड अलका रावसाहेब, जिल्हा चिटणीस मंगेश धानोरकर, जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब गोटे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट मुरलीधर जाधव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड इंदिरा राणे, सहाय्यक जिल्हा चिटणीस रमेश घुगे, जिल्हा संघटन आयुक्त (स्काऊट) राजेश गावंडे यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश