फटाके विक्रेत्यांनी नियमाचे पालन करावे

·       निवासी इमारतीत फटाके विक्री, साठवणुकीस मनाई
वाशिम, दि. २६ :  संयुक्त मुख्य विस्फोटक यांच्या निर्देशानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रतिबंधक व पूर्णतः बंद असणे आवश्यक असून शेडमध्ये कोणताही अनोळखी व्यक्ती प्रवेश करणार नाही, अशी व्यवस्था दुकानदारांनी करावी. फटाक्यांच्या दोन दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटर व प्रोटेक्ट वर्कपासून ५० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशद्वारे एकमेकांसमोर नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी.
फटाक्यांची डिजिटल अॅडोटाईसची फलके दुकानांच्या ५० मीटर अंतरावर असावीत. एका ठिकाणी ५० पेक्षा जास्त दुकाने लावली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. एका फटाक्याच्या दुकानामध्ये जास्तीत जास्त १०० किलोग्रॅम फायर वर्क्स तथा ५०० किलोग्रॅम चायनीज, क्रेकर, स्पार्कलर्स स्फोटके ठेवली जातील, याची दक्षता घ्यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये, पटांगणामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कमीत कमी नुकसान होईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फटाक्यांच्या दुकानामध्ये केवळ ग्रीन क्रेकर विकली जातील. नागरिकांनी दिवाळीच्या कालावधीमध्ये रात्री ८ ते १० वाजता दरम्यानच फटाके फोडावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी, वाशिम यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश