बाकलीवाल विद्यालयात विधी साक्षरता अभियान
·
विद्यार्थ्यांना
कायदेविषयक मार्गदर्शन
वाशिम, दि. १६ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने
१५ व १६ ऑक्टोंबर रोजी बाकलीवाल विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता विधी साक्षरता
अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५ ऑक्टोंबर रोजी विधी प्रदर्शनी व १६
ऑक्टोंबर रोजी विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांनी विद्यार्थ्यांना माता, पिता
व शिक्षक यांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच कायद्याचे ज्ञान असणे का आवश्यक
आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अॅड.
गितांजली गवळी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल, सोशल मिडिया आणि कायदा याविषयी
मार्गदर्शन केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखाधिकारी राजन गंडागुळे यांनी
विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले.
जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याच्या
अभ्यासाचे महत्व समजावून सांगितले. जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार
बेरिया यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक पुस्तकांचे वाचन करण्याविषयी मार्गदर्शन
केले.
यावेळी
विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र व कायदेविषयक पुस्तकांचे वितरण करण्यात
आले. या कार्यक्रमाला जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अॅड. प्रसाद ढवळे, सहसचिव अॅड.
प्रमोद पट्टेबहाद्दूर, कोषाध्यक्ष अॅड. श्रद्धा अग्रवाल, अॅड. अनुपकुमार बाकलीवाल
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अॅड.
अमरसिंग रेशवाल यांनी केले, तर आभार श्री. लहाने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ सुरेंद्रकुमार बाकलीवाल, अनुपकुमार बाकलीवाल व
बाकलीवाल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment