जड मालवाहतूक, जड प्रवासी वाहतूकीच्या परवाना चाचणीमध्ये बदल

वाशिम, दि. २६ : केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १७ मधील उपनियम १ खंड बीमध्ये नवीन परंतुक व नमुना ५ ए समाविष्ट केला आहे. त्यानुसार जड मालवाहतूक व जड प्रवासी वाहतुकीच्या चाचणीसाठीच्या चाचणी टर्ममध्ये इंधनाच्या कार्यक्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी ५ कि.मी. रोडवर आयोजित केली जाणार असून वाहन चालविण्याच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ५ टक्के अचूकतेसह इंधन मोजण्याचे उपकरण असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत नमुना ५ ए मध्ये प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतरच जड मालवाहतूक व जड प्रवासी वाहतुकीचा परवाना (लायसन्स) मिळविण्यासाठी अर्ज करता येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश