कौशल्य विकास प्रशिक्षण इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी

वाशिमदि. २५ : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या किमान कौशल्य कार्यक्रम अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सन २०१८-१९ करिता जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीद्वारे कौशल्य प्रशिक्षणाकरिता विविध १३ क्षेत्रांची निवड करण्यात आली असून या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रत्यक्ष येवून आपले नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीद्वारे कौशल्य प्रशिक्षणाकरिता निवडलेल्या क्षेत्रामध्ये मशरूम शेती, गवंडी, प्लंबर, रेफ्रिजरेशन/एअर कंडीशनिंग/वेंटीलेशन मेकॅनिक (इलेक्ट्रिक कंट्रोल), डाळ प्रक्रिया व मूल्यवर्धन, तेलबिया प्रक्रींय आणि उपपदार्थ निर्मिती, कृषि आधारित पदार्थ, बेसिक ऑटोमोटिव्ह सर्विसिंग (दुचाकी, तीनचाकी वाहन), बेडसाईड असिस्टंट, हेल्थकेअर मल्टीपर्पज वर्कर, इंजेक्शन मोल्डिंग मशीन ऑपरेशन्स (आयएमएमओ), लूम फिटर, व्हेवर, लूम्स-प्लेन पॉवर लूम या १३ क्षेत्रांचा समावेश आहे.
या क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ०७२५२-२३१४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत प्रत्यक्ष कार्यालयात येवून नाव नोंदणी करावी. प्रशिक्षणार्थींना कोणत्याही प्रकारचा प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार नाही. तसेच कार्यालयात येवून नोंदणीबाबत कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता व इतर खर्च उमेदवाराला दिला जाणार नाही, असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश