आपत्ती व्यवस्थापनसंबंधी निबंध, चित्रकला स्पर्धा उत्साहात
वाशिम, दि. १६ : संयुक्त राष्ट्राने घोषित केल्यानुसार जिल्हास्तरावर ११ ते १८ ऑक्टोंबर
दरम्यान आपत्ती निवारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने निवासी
उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
कक्षामार्फत शुक्रवार, १२ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य
सभागृहात निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना
विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
१२
ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ ते १.३० वा. दरम्यान नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये
माझे योगदान या विषयावरील निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ७ वी ते १०
वीच्या वर्गातील तसेच ११ वी ते १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी २५० शब्द
मर्यादेत निबंध स्पर्धा घेण्यात आली. दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान ‘नैसर्गिक व मानव
निर्मित आपत्ती व त्याचे परिणाम या विषयावर ७ वी ते १२ वीमधील विद्यार्थ्यांसाठी
चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक अधीक्षक मीरा
पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मात्रे, प्रताप काळे, अनिल पडघान, गजानन
कांबळे, सुवर्णा सुर्वे, विलास चव्हाण, शेखर ठाकरे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment