माहे नोव्हेंबरचे अन्नधान्य वाटप परिमाण निश्चित

वाशिम, दि. २६ : सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहे नोव्हेंबर २०१८ मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी प्रति व्यक्ती  किलो गहू   किलो तांदुळअंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ३० किलो गहू व  किलो तांदुळआणि एपीएल शेतकरी लाभार्थी यांना प्रति व्यक्ती  किलो गहू व  किलो तांदुळ या प्रमाणे माहे नोव्हेंबर  २०१८ करीता वाटप परिमाण निश्चित केलेले आहेत. सर्व लाभार्थ्यांसाठी धान्याचे विक्री दर हे गहू  रुपये प्रति किलो व तांदुळ ३ रुपये प्रति किलो या प्रमाणे आहेत. 
जिल्ह्यातील सर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड  किलो साखर, १ किलो चना डाळ, १ किलो उडीद डाळ याप्रमाणे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे. साखरेचा किरकोळ विक्री दर २० रुपये, चनाडाळ व उडीद डाळीचा दर ३५ रुपये प्रति किलो प्रमाणे आहे.
जिल्ह्यातील वितरीत होणाऱ्या केरोसीनचे दर वाशिमकरिता २८.६० रुपये प्रति लिटर, मालेगांवकरिता  २८.४० रुपये प्रति लिटर, रिसोडकरिता  २८.७० रुपये प्रति लिटर, मंगरुळपीरकरिता २८.४५ रुपये प्रति लिटर, मानोराकरिता २८.६५ रुपये प्रति लिटर व कारंजाकरिता २८.५५ रुपये प्रति लिटर या प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे. 
१ ऑगस्ट २०१८ च्या शासन निर्णयानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये केरोसीनसाठी पात्र लाभार्थ्यांकडे कोणतेही गॅस जोडणी ननसल्याचे प्रमाणपत्र घेऊनच पात्र लाभार्थ्यांना केरोसीनचे वाटप करण्यात येते. ज्यांच्याकडे गॅस जोडणी नाही, अशा शिधापत्रिकाधारकांनी तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे हमीपत्र उचल किरकोळ विक्रेत्यांकडे सादर करून केरोसीन प्राप्त करून घ्यावे.
दिवाळी सणानिमित्त शासनाकडून जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका १ किलो साखर, तसेच अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना नोव्हेंबर महिन्याकरिता ३५ रुपये प्रति किलो दराने प्रति शिधापत्रिका १ किलो चना डाळ व १ किलो उडीद डाळ उपलब्ध करून देण्यात आली असून लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश