जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे विमोचन
वाशिम, दि. १२ : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात
गेल्या चार वर्षात घडलेल्या विकास कामांवर आधारित लोकराज्य मासिकाच्या
‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ विशेषांकाचे विमोचन जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा
पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सुनील
पाटील, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसेम, माहिती सहाय्यक तानाजी घोलप उपस्थित
होते.
लोकराज्यच्या या विशेषांकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लिहिलेला ‘युगपुरुषाचा आदर्श’ या लेखाचा
समावेश आहे. गेल्या चार वर्षात राज्यात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छता
अभियान, ज्येष्ठ नागरिक धोरण, कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रेशीम
शेती, उन्नत शेती-समृद्धी शेतकरी, मागेल त्याला शेततळे, मत्स्यशेती, प्रधानमंत्री
उज्ज्वला योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, कौशल्य प्रशिक्षण, मुद्रा
योजना, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान, राजर्षी शाहू महाराज शिक्षण
शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना व
मुख्यमंत्री ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानासह इतर योजनांवर आधारित राज्यभरातील
परिवर्तन कथांचा समावेश या विशेषांकात आहे.
Comments
Post a Comment