सातारा सैनिक शाळा प्रवेश प्रक्रिया सुरु
· २६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले
वाशिम, दि. २३ : सातारा येथील सैनिक शाळेमध्ये सन २०१९-२० च्या सत्रातील इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी पात्र मुलांनी २६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी www.sainiksatara.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्या सोबतठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात पोहोचविण्याची अंतिम मुदत ५ डिसेंबर२०१८ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार २ जुलै २००८ ते १ जुलै २००९ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठी उमेदवार २ जुलै २००५ ते १ जुलै २००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा व सध्या मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावा. इयत्ता ६ वीसाठी अंदाजे ६३ व इयत्ता ९ वीसाठी ०७ अशी अंदाजे प्रवेश संख्या आहे.
सहावी आणि नववीतील १५ टक्के जागा अनुसुचित जाती, ७.५ टक्के जागा अनुसुचित जमाती, तर २५ टक्के जागा आजी व माजी सैनिकांची मुले यांच्यासाठी राखीव (अ. ज. व अ. जा. यांच्या राखीव जागा सोडून) असतील.
सामान्य प्रवर्ग, संरक्षण दलातील आजी-माजी कर्मचाऱ्यांची मुले, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्गातील उमेदवारांसाठी ४०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल, तर अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीमधील उमेदवारांसाठी २५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी सातारा येथील सैनिक शाळेच्या दूरध्वनी क्रमांक ०२१६२-२३५८६/२३८१२२ वर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment