महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


वाशिम, दि. ३० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने विशेष घटक योजनेमध्ये ५० हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य तसेच बीजभांडवल योजनेमध्ये ५ लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनांसाठी प्रत्येकी १०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध या जात प्रवर्गातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील व वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असावा. त्याचप्रमाणे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांच्या आत असावे. अर्जदाराचे वय २० ते ६० वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या गरजू बेरोजगार युवक-युवतींनी स्वयंरोजगारसाठी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम या कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक रमेश मनवर यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश