१८ एप्रिल रोजी महिला लोकशाही दिन


१८ एप्रिल रोजी महिला लोकशाही दिन

वाशिम दि.८ (जिमाका) जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही महिला लोकशाही दिनाचे आयोजन
करण्यात येते.जर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सुट्टी असेल तर त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही आयोजित करण्यात येतो. या महिन्यात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन हा १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.असे प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी यांनी कळविले आहे.
****

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर