सामाजिक समता कार्यक्रम महात्मा फुले यांचे सामाजिक कार्याविषयी व्याख्यान संपन्न
सामाजिक
समता कार्यक्रम
महात्मा फुले यांचे सामाजिक कार्याविषयी
व्याख्यान संपन्न
वाशिम, दि. 11 (जिमाका) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता
कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याविषयी
व्याख्यानाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज ११ एप्रिल रोजी करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन जात
पडताळणी प्रमाणपत्र समिती उपायुक्त डॉ. छाया कुलाल यांनी केले. अध्यक्षस्थानी
पोलिस उपअधिक्षक श्री. सातार्डेकर होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंडारे व समाज कल्याणचे सहायक
आयुक्त एम. जी. वाठ प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
करण्यात आली.
श्री.
सातार्डेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर
प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. खंडारे यांनी आपल्या
व्याख्यानामध्ये पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात महात्मा फुले हे अग्रणी
होते असे सांगून महात्मा फुले हे सामाजिक
न्यायाचे उदगाते होते. स्त्रियांना समतेची वागणूक देणारे महात्मा फुले हे एकमेव
कर्ते सुधारक होते. त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला. समाजातील जातीयता नष्ट
करायची असेल तर आंतरजातीय विवाह करणे आवश्यक आहे. समता मूलक व्यवस्था निर्माण
करण्याचे काम महात्मा फुले यांनी करुन सत्यशोधक समाजाची स्थापना केली. छत्रपती
शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहीला आणि शेवटी त्यांनी त्यांच्या मनोगतात जयंतीच्या
कार्यक्रमात नाचल्याने आपले परिवर्तन होणार नाही तर वाचल्याने आपले परिवर्तन होणार
असल्याचे सांगितले.
सुरकुंडी
येथील अनुसूचित जाती मुलींची शाळाचे सहाय्यक शिक्षक श्री. अमोल साळवे यांनी
महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता सादर केली.
कार्यक्रमाचे संचालन श्री सरस्वती समाज कार्य महाविद्यालयाचे प्रा. ज्ञानेश्वर
कच्चर यांनी केले. आभार श्री. अमोल साळवे यांनी मानले. यावेळी वरिष्ठ समाज कल्याण
निरीक्षक राहुल चौंडकर आणि समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया
संख्येने उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment