७ मे रोजी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत

 

७ मे रोजी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत

          वाशिम, दि. 20 (जिमाका) : ७ मे २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालय, वाशिम आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे (आपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे वगळून), आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भु-संपादन प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे, मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद या प्रकरणांचा समावेश असणार आहे.

          ज्या पक्षकारांची वर नमुद प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी ७ मे २०२२ रोजी आपली प्रकरणे आपसात करण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोदविण्याकरीता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांच्याशी संपर्क साधावा. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सावंत, आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, न्या. संजय शिंदे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे