शिष्यवृत्ती योजना प्रलंबित अर्ज 25 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे

 

शिष्यवृत्ती योजना प्रलंबित अर्ज

25 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे

          वाशिम, दि. 20 (जिमाका) : सन २०२१-२२ या सत्रातील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज व त्रृटी पुर्ततेकरिता विद्यार्थ्यांचे लॉगीनला परत करण्यात आलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.

             जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालकांनी या प्रलंबित अर्जाची त्रृटी  पुर्तता करुन आवश्यक कागदपत्रांसह पात्र अर्ज २५ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास तात्काळ सादर करावे. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर ऑनलाईन योजनांचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे अर्ज २५ एप्रिलपर्यंत अर्जाची पडताळणी करुन पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास ऑनलाइन फॉरवर्ड करावे. Send Back अर्ज जास्तीत जास्त प्रमाणात व त्वरीत निकाली काढावे. अन्यथा विहित मुदतीत अर्ज या कार्यालयास सादर न केल्यास व विद्यार्थ्यांकडुन शासन अनुज्ञेय शुल्क वसुल केल्यास संबंधित महाविद्यालय कारवाईस पात्र राहिल यांची नोंद घ्यावी. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे