7 ते 11 एप्रिलपर्यंत पोहरादेवी येथील मद्यविक्री परवानाधारक दुकाने बंद राहणार
7 ते 11 एप्रिलपर्यंत पोहरादेवी येथील
मद्यविक्री परवानाधारक दुकाने बंद राहणार
वाशिम, दि. 06 (जिमाका) : मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे 7 ते 11 एप्रिल दरम्यान रामनवमी यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून 7 ते 11 एप्रिल 2022 दरम्यान श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील मद्यविक्रीची परवाना (अनुज्ञप्तीधारक) दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे.
श्रीक्षेत्र पेाहरादेवी येथे रामनवमी यात्रा उत्सव 7 ते 10 एप्रिलपर्यंत तसेच पोहरादेवीजवळील उमरी या गावी सुध्दा 11 एप्रिलपर्यंत हा उत्सव सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोणातून मुंबई दारुबंदी कायदयाअंतर्गत श्रीक्षेत्र पोहरोदवी येथील मद्यविक्रीची परवानाधारक (अनुज्ञप्ती) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी, वाशिम यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे नांवे असलेली अनुज्ञप्ती मुंबई दारुबंदी कायदयाच्या कलमानुसार रद्द करण्यात येईल. असे या आदेशात नमुद केले आहे.
Comments
Post a Comment