पोहरादेवी यात्रा : बोकड बळीची प्रथा बंदउच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाविकांनी पालन करावे
पोहरादेवी यात्रा : बोकड बळीची प्रथा बंद
उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाविकांनी पालन करावे
वाशिम दि.०५ (जिमाका) देशातील असंख्य बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी हे मुख्य श्रद्धास्थान आहे. जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील मानोरा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पोहरादेवी आणि उमरी (खुर्द) येथे ७ ते ११ एप्रिल दरम्यान पोहरादेवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील माता जगदंबा देवीच्या मंदिरासमोर पूर्वीच्या बंजारा समाजाच्या प्रथेनुसार भाविक आपला नवस फेडण्याकरीता बोकड बळी देतात.उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जगदंबा देवीच्या मंदिरासमोर बोकड बळीची प्रथा बंद करण्यात आली आहे.
पोहरादेवीच्या यात्रेत महाराष्ट्रातून तसेच आंध्रप्रदेश,तेलंगणा,कर्नाटक गुजरात व राजस्थान या राज्यातून दोन ते अडीच लाख बंजारा समाजाचे भाविक येतात.यात्रेमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येणे-जाणे करून आपला नवस फेडण्याकरीता मंदिराच्या दूर अंतरावर जाऊन बोकडबळी देऊन आपला नवस फेडतात.
Comments
Post a Comment