अवैधरित्या प्रवासी वाहतूक करीत असलेल्या बाईक टैक्सीने प्रवास करु नये
अवैधरित्या
प्रवासी वाहतूक करीत असलेल्या
बाईक टैक्सीने प्रवास करु नये
वाशिम, दि. 11(जिमाका) : राज्यातील रिक्षा संघटन नागरीक तसेच विविध माध्यमांतून बाईक
टॅक्सी संदर्भाने तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. राज्यात खाजगी दुचाकीचा
बेकायदेशीर वापर काही संस्था अॅप आधारीत प्रणालीमधून करीत असल्याचे निदर्शनास आले
आहे. त्याठिकाणी संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कारवाई केलेली आहे. राज्य
शासनाने अथवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारचा कोणताही परवाना
कोणालाही अद्याप जारी केलेला नाही.
जिल्ह्यातील
नागरिकांना आवाहन करण्यात येते की,प्रवाशांची फसवणूक होऊ नये म्हणून तसेच
त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून बाईक टॅक्सी व अवैधरित्या प्रवासी वाहतूक
देणाऱ्या दुचाकी वाहनांमधून नागरीकांनी प्रवास करु नये. तसेच अशा अॅपचा वापर करु
नये.अशा वाहनांचा वापर मोटार वाहन कायद्याप्रमाणे बेकायदेशीर असून अशा
वाहनांविरुद्ध कारवाई करण्याच्या सुचना राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत.असे उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.
*******
Comments
Post a Comment