15 ते 29 एप्रिल ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर



15 ते 29 एप्रिल

ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीर

           वाशिम, दि. 12 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र वाशिम अंतर्गत जिल्हयात विविध खेळांचे खेळाडू तयार व्हावे. खेळाडूंना विविध खेळांचे अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण व खेळाची सर्व माहीती मिळावी हा दृष्टीकोन समोर ठेवून जिल्हास्तरीय ग्रीष्मकालीन क्रीडा शिबीर 15 एप्रिल ते 29 एप्रिल 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे आयोजीत करण्यात येणार आहे. या क्रीडा प्रशिक्षण शिबीरात धनुर्विद्या, कबड्डी, खो-खो, रायफल शुटींग, कुस्ती, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, कराटे, किकबॉक्सिंग, वेटलिफ्टींग, बॉस्केटबॉल, स्क्वॅश इत्यादी खेळांचे तज्ञ प्रशिक्षणाकडुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरामध्ये जिल्हयातील शालेय व शाळाबाहय मुलां-मुलींना प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येईल. हे प्रशिक्षण शिबीर अनिवासी असून विनामुल्य असणार आहे.

               विविध खेळ प्रकारातील खेळाच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये ८ ते १२ वर्ष वयोगटातील मुलां-मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे. नमुद सर्व खेळांचे प्रशिक्षण शिबीर हे जिल्हा संकुल वाशिम येथे आयोजीत करण्यात येणार आहे. नोंदणी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे मिळतील. तरी या प्रशिक्षण शिबीराचा जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता

गुप्ता यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे