स्त्रीभ्रृण हत्या व बालविवाह रोखण्यास प्रत्येकाने दक्ष असावे -न्या. संजय शिंदे



 

स्त्रीभ्रृण हत्या व बालविवाह रोखण्यास प्रत्येकाने दक्ष असावे

                                                                              -न्या. संजय शिंदे

          वाशिम, दि. 20 (जिमाका) : आज देखील आपण पुरुष प्रधान मानसिकतेत जगतो. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आपण स्त्रीभ्रृण हत्या तसेच बालविवाह यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दक्ष असावे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे यांनी केले.

               20 एप्रिल रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त वतीने जिल्हा न्यायालयातील सभागृहात आयोजित बालविवाह प्रतिबंध अधिनियम या विषयावरील कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात अध्यक्ष म्हणून न्या. शिंदे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून न्या. एम.एस. पदवाड, न्या. आर.पी. कुलकर्णी, ॲड. समाधान सावळे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी. जुमडे यांची उपस्थिती होती.

               न्या. श्री. पदवाड यांनी गर्भलिंग निदान आणि प्रतिबंध याविषयावर न्या. आर.पी. कुलकर्णी यांनी नागरीकांचे मुलभूत कर्तव्य, ॲड. समाधान सावळे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम याविषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पक्षकार, विधीज्ञ मंडळी व न्यायालयातील कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी. जुमडे यांनी मानले. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे