सामाजिक समता कार्यक्रम मार्जिन मनी योजना कार्यशाळा संपन्न
सामाजिक समता कार्यक्रम
मार्जिन मनी योजना कार्यशाळा संपन्न
वाशिम दि.१२ (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय मार्जिन मनी योजना कार्यशाळा आज 12 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपन्न झाली. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी बैंक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर तर प्रमुख मार्गदर्शक नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे व्यवस्थापक प्रसन्न रत्नपारखी, जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक कमाल शेख, इतर मागासवर्ग महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मुकेश उमक आणि समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. श्रीमती बजाज यांनी स्वयंम पोर्टलबाबत माहिती सांगून कौशल्य व उद्योजकता विभागाच्या अन्य योजनांची माहिती दिली. श्री. कोकडवार यांनी उद्योग करतांना मार्केटिंगवर भर देण्यास सांगून कर्ज घेण्यासाठी लागणा-या तांत्रिक बाजूची माहिती सांगितली. श्री. शेख यांनी उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती दिली.तसेच उपस्थितांच्या समस्येचे शंका निराकरन केले. श्री. रत्नपारखी यांनी उद्योग उभारण्यासाठी लागणा-या कौशल्याची व मानसिकतेची माहिती देवून उद्यमशील सर्वांनी बनले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी जल शपथ घेतली.
अध्यक्षीय मार्गदर्शनातुन श्री.निनावकर यांनी उद्योग उभारणीमध्ये वाशिम जिल्ह्याच्या वाटचालीबद्दल जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेल्या विविध कर्जाची तसेच बँकांच्या विविध योजनांची माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून श्री. शिरभाते यांनी समाज कल्याण विभागाच्या मार्जिन मनी योजनेविषयी माहिती दिली. या योजनेची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले. संचालन प्रा. डॉ.गजानन हिवसे यांनी केले. आभार श्रीमती संध्या देखणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते, समाज कल्याण निरीक्षक विजय भगत, कनिष्ठ लिपीक एस. एम. निमन, लघुटंकलेखक व समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी तसेच सहकारी ब्रिक्स इंडिया प्रा. लि. पुणेचे जिल्हा व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी परीश्रम घेतले.
*******
Comments
Post a Comment