जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळा संपन्न



जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळा संपन्न

           वाशिम, दि. 12 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३1 व्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिमच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वी (विज्ञान) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष माहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने 8 एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे जात पडताळणीची कार्यपध्दती याबाबत जिल्ह्यातील सर्व इयत्ता ११ वी, १२ वी व तंत्रनिकेतन, डी. फार्म या महाविद्यालयांच्या प्राचार्य व इतर कर्मचारी यांचेकरीता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल. बी. राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून उपायुक्त तथा सदस्य डॉ. छाया कुलाल, पोलीस उप अधिक्षक, सुहास सातार्डेकर, संशोधन अधिकारी मारोती वाठ व पोलीस निरीक्षक विजय राठोड आदी उपस्थित होते.

               कार्यशाळेत मोहनकुमार तिडके व वैभव घुगे यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यावेळी एल. बी. राऊत यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. छाया कुलाल यांनी केले. सुत्रसंचालन विधी अधिकारी अॅड. किरण राऊत यांनी केले. आभार सुहास सातार्डेकर यांनी मानले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी गोपाल गणोदे, स्वाती पवार, वैशाली पठाडे, सुमेध खंडारे, पंकज ठाकुर, अरविंद ताजणे, संजय ठाकुर, राम कष्टे इत्यादींनी परिश्रम घेतले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे