सामाजिक समता कार्यक्रम 501 जात वैधता प्रमाणपत्राचे यशस्वी वाटप
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक समता कार्यक्रम
501 जात वैधता प्रमाणपत्राचे यशस्वी वाटप
वाशिम, दि. 13 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन 6 ते 16 एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे. त्या निमित्ताने आज 13 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथे संविधान जागर-संविधान जनजागृती कार्यक्रमाचे औचित्य साधून यापुर्वी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त संकल्प जाहिर केल्यानुसार समिती कार्यालयाकडून 501 ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये जात वैधता प्रमाणपत्र वितरण करण्याकरीता विद्यार्थी, सेवा व निवडणूक लाभार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांना मान्यवरांच्या जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. जे लाभार्थी उपस्थित नव्हते त्यांच्या ई-मेलवर ऑनलाईन पध्दतीने जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती सदस्य व सर्वच कर्मचारी वृंद यांच्या अथक प्रयत्नाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाने 501 ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्याचे ध्येय गाठले.
जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, संशोधन अधिकारी मारोती वाठ, पोलीस उपअधिक्षक एस.बी. सातार्डेकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. कुलाल यांनी तर कार्यक्रमाचे संचालन ॲड. किरण राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार संशोधन अधिकारी मारोती वाठ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाल गणोदे, सारंग गावंडे, स्वाती पवार, वैशाली पठाडे, सुमेध खंडारे, मोहन तिडके, वैभव घुगे, पंकज ठाकुर, अरविंद ताजने, संजय ठाकुर, राम काष्टे, कविता पुर्णे व अनिल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment