दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्रासाठी विशेष मोहिम
दिव्यांग प्रमाणपत्र
व वैश्वीक ओळखपत्रासाठी विशेष मोहिम
वाशिम, दि. 11 (जिमाका) : सामाजिक न्याय
व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक 2 डिसेंबर 2021 अन्वये दिव्यांग व्यक्तींना
संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्वीक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी
जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त दिव्यांग लाभार्थ्यांना संगणकीय प्रणालीव्दारे
ऑनलाईन दिव्यांग ओळखपत्र व वैश्वीक ओळखपत्र (UDID) बाबत तपासणीकरीता 13 एप्रिल
2022 रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्हा शल्य चिकित्यक, सामान्य रुग्णालय,
वाशिम येथे शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. आणि जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित केले
आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन
जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी एम.जी.वाठ यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment